
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील सावळे येथील ज्येष्ठ व आदरणीय नागरिक लक्ष्मीबाई आंबो भोईर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या १०६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. दीर्घायुष्य लाभलेल्या लक्ष्मीबाई भोईर यांनी कुटुंब व समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा व आप्तेष्टांनी भरलेला परिवार आहे.
लक्ष्मीबाई भोईर या प्रेमळ, शांत, हसतमुख व मायेने सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावाच्या होत्या. त्यामुळे त्या गावात सर्वत्र आदराने ‘आई’ या नावाने ओळखल्या जात होत्या. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकावर त्यांनी आपल्या मायेची छाया पसरवली होती. त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ, नातेवाईक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र गुळसुंदे येथे होणार असून उत्तरकार्य शनिवार दिनांक ०३ जानेवारी रोजी सावळे येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.



Be First to Comment