Press "Enter" to skip to content

कर्जत पंचायत समितीत सभापती सुजाताताई मनवे यांच्या हस्ते ध्वजारोहण

शाखा अभियंता सुजीत धनगर यांचा कोरोना योद्धा म्हणून आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या हस्ते सत्कार !

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे #

स्वतंत्र दिनानिमित्त पंचायत समिती कर्जत येथे सभापती सुजाताताई मनवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सदर कार्यक्रमास आमदार महेंद्रशेट थोरवे , माजी सभापती प्रदीपशेट ठाकरे , संकेत भासे – नगरसेवक कर्जत नगर परिषद, शरद लाड माजी नगराध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते कर्जत न.प . गटविकास अधिकारी बालाजी पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी राजपूत , इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

त्याचवेळी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून गंदगी मुक्त अभियानाची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली तसेच बेटी बचाव अभियानाची प्रतिज्ञा सुद्धा घेतली . कर्जत पंचायत समितीचे शाखा अभियंता सूजीत धनगर यांना काही दिवसांपूर्वी कामकाज करताना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता , मात्र त्यांनी त्यावर मात करून बाहेर पडले व व्यवस्थित होऊन कामावर रुजू झाले. त्यांनी कोरोना लढा देऊन ऑफिस मध्ये आल्याबद्दल आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.