कोरोनाच्या संकटात सुधागडात करीत असलेल्या प्रेरणादायी कार्याचे होतेय कौतुक
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील कृषी कन्या रसिका फाटक व तिच्या कुटुंबीयांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत दहिगाव पंचक्रोशीतील दहिगाव बौद्धवाडा व आमणोली बौद्धवाडा येथील 40 गोरगरीब, गरजवंत कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य व मास्कचे वाटप केले. फाटक कुटुंबियांच्या या प्रेरणादायी,सेवाभावी व कृतिशील कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संपूर्ण जगभरात कोरोनाच्या जैविक महामारीने हाहाकार माजविला आहे. सर्वत्रच याचे विपरीत परिणाम दिसून आले. अशातच कोरोना, लॉक डाऊन व निसर्ग चक्री वाळासारख्या एका पाठोपाठ एक आलेल्या महाभयावह संकटाचा सामना करताना गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य, हातावर पोट असलेले मजूर यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली.
अशावेळी समाजातील सामाजिक व सेवाभावी संस्थांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्स राखून रसिका फाटक यांची आई सौ.अश्विनी फाटक व बाबा श्री .अनिल फाटक.बहिण आरती फाटक व भाऊ प्रेम फाटक आदींनी गरजवंतांना अन्नधान्य पाकिटाचे वाटप केले. तसेच कोरोना या आजाराविषयी जनजागृती करीत मास्कचे देखील वाटप केले.
यावेळी ग्रुप ग्राम पंचायत दहिगाव
सरपंच सौ.सुषमा देशमुख,
सदस्य श्री .अनाजी मनवे,
पोलीस पाटिल श्री .संतोष देशमुख,
रा.जि.प शाळा दहिगाव मुख्खाध्यापक श्री .सुशांत सकपाळ,
ग्रामसेवक श्री .सचिन केंद्रे ,
तंटामुक्त अध्यक्ष श्री .यशवंत गायकवाड,
सौ.जयश्री देशमुख ,प्रतिक देशमुखआदि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.








Be First to Comment