नागोठण्यातील हायवे नाका येथील उड्डाण पुलाखाली ठेकेदार कंपनीकडून उपाययोजना
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठण्यातील हायवे नाका येथील उड्डाण पुलाखालची धोकादायक परिस्थिती सिटी बेल वर मध्ये प्रसिद्ध होताच उड्डाण पुलालगतच्या नाल्यात अजून एक पाईप टाकून त्या ठिकाणचे वळण रुंद करण्याबरोबरच पुलाखालील बाजूस असलेल्या धोकादायक पोलादी सळ्या गॅस कटरच्या सहाय्याने काढण्यात काढण्यात आल्या आहेत. महामार्गाचे ठेकेदार कंपनीने या ठिकाणच्या धोकादायक परिस्थितीवर त्वरित उपाययोजना केल्याने वाहन चालक व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरील नागोठण्यातील गजबजलेला नाका असलेल्या हायवेनाका येथील उड्डाण पुलाच्या खालील बाजूस ठेकेदार कंपनीकडून अनेक त्रुटी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळेच या उड्डाण पुलाखालून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनाची वर्दळ या पुलाखालून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी महामार्ग कामाचे ठेकेदार असलेल्या कंपनीने यावर तातडीची उपाययोजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली होती. प्रस्तुत प्रतिनिधीने हायवेनाका पुलाखालील ही सर्व वस्तुस्थिती कंपनीचे प्रकल्प अधिकारी जयदेव ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याचबरोबर याबाबतचे वृत्तही सिटी बेलने आपल्या १२ जुलैला सचित्र प्रसिद्ध केले होते. याचीच दखल घेत ही उपाययोजना करण्यात आल्याने सिटी बेल व प्रस्तुत प्रतिनिधीचे नागरिकांनी आभार मानले आहेत.






Be First to Comment