Press "Enter" to skip to content

व्यापारी असोसिएशनकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त

सिटी बेल लाइव्ह / पनवेल(प्रतिनिधी)

पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने सुरू करण्यासंदर्भात केलेली मागणी आणि सातत्य पूर्ण पाठपुराव्याबद्दल कापड व्यापारी असोसिएशन पनवेलने आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभारपत्र देऊन आभार व्यक्त केले.

कापड व्यापारी असोसिएशनचे राजकुमार सचदेव व मुकेश शहा यांनी दिलेल्या आभारपत्रात म्हंटले आहे की, आम्ही व्यापारी वर्ग आपणांस धन्यवाद देतो, सध्या चालू असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व या महामारी मध्ये पनवेल शहर व येथील नागरीक आता बऱ्या व उत्तम प्रकारे कोरोना प्रादुर्भावाच्या संकटातून बाहेर आलेले दिसत आहेत. हे केवळ आपल्या मौल्यवान पाठिंब्यामुळे शक्य झालेले आहे.

गेल्या ५ महिन्यांपासून भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या सुचने प्रमाणे पनवेल शहरातील नागरीक, व्यापारी हे लाकडॉऊन चे काटेकोर पणे पालन करत होते. परंतू सदर परिस्थीती आता कोरोना मुक्त होताना दिसत आहे व पनवेल शहरातील जीवन शैली पुन्हा नव्याने पुर्वीपासून चालू होत आहे.

सदरहू १५ ऑगस्ट पासून पनवेल शहरातील हालचाली व व्यापारांची दुकानाची वेळ हि पुर्वीसारखी केली आहे. व हे केवळ आपण केलेल्या सहकाऱ्यामुळे शक्य झाले आहे व असाच मजबूत पाठबळ आपणांकडून आम्हांस भविष्यात पण मिळेल याची अपेक्षा करत आहोत. तरी सदर कोरोना विषाणू बाबत योग्य ती काळजी आम्ही घेऊ याची पुर्ण हमी आम्ही देत आहोत, असेही व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना दिलेल्या आभारपत्रात नमूद करून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.