सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
भारतीय बौद्धमहासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत पेण तालुक्याच्या वतीने पेण तालुक्याचे अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र वर्षावासानिमित्त विविध धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात आले. पेण तालुक्यातील बेणसे सिध्दार्थनगर या ठिकाणी दिनांक दि.(15) शनिवार या दिवशी वर्षावासाचे आठवे पुष्प यशस्वीपणे संपन्न झाले.
महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.सहदेव काशिनाथ भगत साहेब यांनी केले उपस्थित सर्व महिला उपाशिका व सर्व उपासक यांचे स्वागत आयु.संतोष पांडुरंग अडसुळे यांच्या हस्ते
करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आयु.चंद्रकांत पांडुरंग अडसुळे साहेब यांनी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाला योगदान या विषयावर अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे मार्गदर्शन केले. तसेच पेण तालुक्याचे संरक्षण विभाग उपाध्यक्ष आयु.भगवान शिंदे साहेब व पेण तालुक्याचे पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष तथा बेणसे ग्रामपंचायत सदस्य संतोष अडसुळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमास आयु.आदित्य भगत, आयु.भावेश भगत,आयु.योगेश भगत,आयु.अमित अडसुळे,आयु.अमित शिंदे,आयु.आदिनाथ अडसुळे, सौ.आशा शिंदे,सौ.आशा भगत,सौ.कविता अडसुळे,सौ.पुजा अडसुळे,सौ.ममता भगत, आरती भगत,सौ.अमृता शिंदे नंदाबाई अडसुळे,सौ.रेणुका भोईर आदि उपस्थित होते. माजी श्रामणेर आदित्य भगत यांनी आभार मानले. खीरदान वाटप करून कार्यक्रमाचा गोड शेवट झाला.







Be First to Comment