सोशल डीस्टन्सिग व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अष्टमी मराठी शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहा (नंदकुमार मरवडे)
७४ वा भारतीय स्वातंत्र्य दिन रोहा नगर पालिका प.पू.पांडूरंगशास्त्री आठवले विद्यामंदीर अष्टमी मराठी शाळा क्रमांक ३ येथे. कोरोनाच्या जागतिक महामारी संकटात मार्च महिन्यापासून धाडसी वृत्तीने अष्टमी विभागात कोरोना सर्वेक्षण पथकातील सचिव म्हणून महत्त्वाची कामगिरी सांभाळणाऱ्या कोरोनायोद्धा म्हणून अष्टमी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नम्रता नारायण पानसरे यांच्या हस्ते अष्टमी मराठी शाळा क्रमांक ३ येथे ध्वजारोहण करण्यात आले.वाढत चाललेल्या कोरोना महामारीचे व सद्य परिस्थितीचे सा-यांनीच भान ठेऊन सुव्यवस्थेचे पालन करण्यात आले.तर भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र विद्यार्थीवर्गाविना हा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते.






Be First to Comment