Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्यदिनी मनसेने केले कोरोना योध्यांना सन्मानित

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #

रसायनी येथील डॉ.मिलिंद भगत, डॉ.शितल भगत यांनी कोरोना संकटात नागरिकांना दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल तसेच बारवई पुल येथील विद्या क्लिनिक येथील डॉ. किशोर साळुंखे यांनी कोरोनाचे संकट असताना सुध्दा माणुसकीच्या नात्याने पोयंजे, बारवई, मोहोपे, खानावले,तळेगाव, तळेगाववाडी, ठोंबरेवाडी, पोयंजेवाडी, पालीवाडी भोकरपाडा तसेच आजूबाजूच्या अनेक गावांतील जनतेची वैद्यकीय सेवा केल्या बद्दल तसेच कोरोना संकट व चक्रीवादळात पोलिस कामगिरी चोख बजावणा-या रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांना स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्त साधुन कोरोनायोद्धा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शाल, सन्मान चिन्ह देऊन मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश नारायण पडवल यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी सोशल डिस्टिंक्शनचे काटेकोर पालन करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले.याप्रसंगी
अविनाश पडवळ(मनसे पनवेल तालुका अध्यक्ष) यांच्यासह मनसेचे मान्यवर व रसायनी गणेशनगर येथील वृदांवन फ्लोरा सोसायटी तील सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.