सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासईमध्ये स्कूल कमिटी चेअरमन अरुण जगे यांच्या अध्यक्षतेखाली दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी कामगार नेते व भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष व कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, हायस्कूलचे नुतन प्राचार्य अरुण घाग, उपमुख्याध्यापक खाडे, पर्यवेक्षक साळुंखे, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टिकून सर्व गुण संपन्न झाला पाहिजे असा विश्वास कामगार नेते सुरेश पाटील यांनी व्यक्त केला. इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.






Be First to Comment