व्यापारी असोसिएशनच्या वतीने ध्वज वंदन कार्यक्रमाचे आयोजन.
सिटी बेल लाईव्ह/ उलवे.
उलवे नोड येथील सेक्टर 20 येथील व्यापारी असोसिएशन च्या वतीने ध्वजवंदन आयोजित करण्यात आले होते.श्री साई देवस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांच्या शुभहस्ते संविधान चौकामध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना रवीशेठ पाटील म्हणाले की उलवे नोड मधील व्यापारी असोसिएशनचे कौतुक करावे तितके थोडे आहे. कोरोना महामारी च्या कालखंडामध्ये व्यापारी मंडळींचे व्यवसाय बंद असून देखील त्यांनी मुक्तहस्त पणे गरीब व गरजू जनते करता अन्नधान्य तथा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. स्वतःच्या व्यवसायात नुकसान होत असताना देखील आपल्या घासातला घास काढून गरजवंताला देणं हीच खरी माणुसकी. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत, जेव्हा-केव्हा व्यवसाय करण्यास अल्प अनुमती मिळत असे तेव्हादेखील व्यापारी असोसिएशन मधील समस्त सदस्यांचे उद्दिष्ट हे जनसेवेचे असायचे. नफा नाही झाला तरी चालेल परंतु घरोघरी जीवनावश्यक जिन्नस पोहोचले पाहिजेत या प्रमाणित सेवभावतून काम करणारी ही मंडळी आहेत.मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा विषाणू महामारी चा कालखंड लवकरात लवकर संपुष्टात येवो अशी प्रार्थना करतो.
यावेळी रवीशेठ पाटील यांच्यासमवेत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,पदाधिकारी सदस्य व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment