
पनवेल तालुक्यातील पारगाव गावातील एका खवय्याने तब्बल २४ हजार रुपये मोजून खरेदी केला हा मासा
पनवेल दि.१७ (वार्ताहर) : पनवेल जवळील खाडीत लावण्यात आलेल्या वाणा प्रकारच्या मासेमारीत कोल्ही कोपर येथील मत्स्यप्रेमींना हवाहवासा जिताडा मासा सापडला. कोपर गावातील गावातील संत्तेवान पाटील, चंद्रकांत म्हात्रे, पारगाव गावचे अंकुश गायकवाड पनवेल खाडीत मीलाला पिढ्यान पिढ्या मासेमारीचा धंदा करीत असून या मासेमारांना तब्बल 20 किलो वजनाचा जिताडा मासा मिळाला. पनवेल तालुक्यातील पारगाव गावातील एका खवय्याने तब्बल 24 हजार रुपये मोजून हा मासा खरेदी केल्याची माहिती संत्तेवान पाटील यांनी दिली.
रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात जिताडा मासा म्हणजे अगदी पापलेट, हलव्याला देखील बाजूला ठेवणारा मासा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर मासळीचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिताडा ओळखले जाते. जिताडा प्रकारचा सर्वात मोठा 20 किलोचा मासा पनवेलच्या कोल्ही-कोपर गावातील संत्तेवान पाटील, चंद्रकांत म्हात्रे, पारगाव गावचे अंकुश गायकवाड या मासेमारांना मिळाला आहे. खाडी किनारी सुमारे एक ते दोन किमीच्या परिघात काठ्या गाडून त्याला जाळे बांधले होते. आणि पूर्ण भरती झाल्यावर जाळे खाडीच्या बाजूने काठीच्या उंचीवर उभे केले होते. त्यामुळे जाळे आणि किनारा यांच्यामध्ये अडकलेली मासळी या वाणा प्रकारच्या खाजणी मासे पकडणीत मिळत असते. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी तर पैशाने जी कामे होत नव्हती, ती या जिताडा माशाने अगदी जलद होत असायची.




Be First to Comment