Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उलवेकरांच्या सेवेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रुजू

रवी शेठ पाटील यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन

सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनील ठाकूर )

कोरोना विषाणू महामारीचा कालखंड आपल्याला खूप काही शिकवत आहे.अद्ययावत रुग्णालय आपल्या विभागात कार्यरत असणे याचे महत्त्व एव्हाना पटू लागलंय, किंबहुना सर्व सोयींनी युक्त असे हॉस्पिटल आपल्या आजू बाजूला असणे ही काळाची गरज बनली आहे. असेच एक सर्व सोयींनी व सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल उलवे करांच्या सेवेत रुजू झाले आहे. श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवी शेठ पाटील यांच्या शुभहस्ते या हॉस्पिटल चे उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी आपल्या भावना प्रकट करताना रवी शेठ म्हणाले की,अत्यंत योग्य वेळेस हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जनसेवेत रुजू होत आहे.स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून या हॉस्पिटलचा शुभारंभ होत असल्याचा आनंद आहे. covid महामारी च्या काळामध्येहॉस्पिटलचे काय महत्व असते ते एव्हाना नागरिकांना कळून चुकले आहे. डॉक्टर अमरदीप गरड व त्यांच्या टीमला मी शुभेच्छा देतो.

उद्घाटनाचे दिवशी उलवे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब आणि राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विषाणू महामारी च्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्या कारणामुळे असा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्या बद्दल रवीशेठ पाटील यांनी हॉस्पिटल व आयोजकांचे कौतुक केले.

यावेळी रवीशेठ पाटील यांच्या समवेत डॉक्टर अमरदीप गरड,पोलीस निरीक्षक माधव इंगळे, सचिन मोरे आदी मान्यवरांच्या सह सहकारी डॉक्टर्स व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.