Press "Enter" to skip to content

गुरुनाथ साठेलकर यांनी प्रवीण शेंद्रे यांच्या मदतीने केले घोरपडीवर उपचार


लॅब्रेडोरच्या हल्ल्यात जखमी घोरपडीला मिळाले जीवदान

खोपोली, ता. १४ :
खोपोली शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात विनी इंजिनिअरिंगच्या आवारात आज सकाळी घडलेल्या घटनेत लॅब्रेडोर जातीच्या मॅक्स नावाच्या सुरक्षा कुत्र्याने अचानक आलेल्या घोरपडीवर हल्ला केला. काही वेळ भुंकून आवाराबाहेर घालवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मॅक्सने घोरपडीला चावा घेऊन जखमी केले. प्रतिकार म्हणून घोरपडीनेही आपल्या शेपटीने मॅक्सवर फटके दिले, त्यामुळे परिसरात थरारक वातावरण निर्माण झाले होते.

घोरपड अर्धमेली झाल्यावर मॅक्स शांत झाला. यावेळी उपस्थित निलेश कुदळे यांनी मॅक्सला आवरले आणि जखमी घोरपडीला शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनी तत्काळ हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली.

गुरुनाथ साठेलकर यांनी प्रवीण शेंद्रे यांच्या मदतीने घोरपडीवर प्राथमिक उपचार केले. पाणी व अल्प आहार दिल्यानंतर घोरपडीला सुरक्षित पिंजऱ्यात ठेवण्यात आले. काही तासांच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा ठणठणीत दिसू लागली. अखेरीस वनक्षेत्रात तिला सोडण्यात आले.

या घटनेत सुरक्षाकामी पाळलेल्या मॅक्सने आपली जबाबदारी पार पाडली असली, तरी निलेश कुदळे व हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून दाखवलेले प्राणीप्रेम विशेष कौतुकास्पद ठरले. त्यांनी एका जखमी प्राण्याला जीवदान देत निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, असा जणू संदेश या निमित्ताने दिला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.