Press "Enter" to skip to content

खांब-कोलाड विभागात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मराठे)


खा़ंब-कोलाड विभागात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सध्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले असल्याने सर्वच सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत.त्यामुळे या विभागातही स्वातंत्र्यदिनही साजरा करताना सर्व नियमांचे पालन करून स्वातंत्र्याचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळा,काँलेज,शासकीय कार्यालये व ग्रा.पंचायत कार्यालये येथे साजरा करताना शासकीय नियम व सोशल डिस्टनशिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले.वाढत चाललेल्या कोरोना महामारीचे व सद्य परिस्थितीचे सा-यांनीच भान ठेऊन सुव्यवस्थेचे पालन करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र विद्यार्थीवर्गाविना हा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात आला.

शाळा,काँलेजमध्ये शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तर ग्रा.पंचायत कार्यालयात सरपंच,उपसरपंच, ग्रा.सेवक व काही सदस्य तर शासकीय कार्यालयात मुख्य शासकीय अधिकारी यांनी हा स्वातंत्र्यदिन नियमानुसार साजरा केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.