
पनवेल दि. २९ ( वार्ताहर ) : भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस, मा. नगरसेवक पनवेल महानगरपालिका, संस्थापक अध्यक्ष जाणीव एक सामाजिक संस्था तसेच अभिनव युवक मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात शहरातील अभिनव युवक मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाच्या मंडपात पक्षाच्या पदाधिकारी , कार्यकर्ते , मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून शुभेच्छा स्वीकारीत साजरा करण्यात आला .
यावेळी भाजप पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव , कोषाध्यक्ष प्रवीण मोरबाळे , सचिव रुपेश नागवेकर , उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे ,मा. नगरसेविका सुहासिनी शिवणेकर , पत्रकार संजय कदम , मंडळाचे अध्यक्ष अल्पेश पाडावे , उमेश इमानदार, मयूर चिटणीस , सुधीर देसाई,राजा चव्हाण , राजू सावंत, शैलेश कदम , पूर्णेदू साळवी , तुषार कापरे , परेश बोरकर , संजय शेट्टी , प्रसाद कंधारे , संतोष लाड,दक्ष नागवेकर आदींसह नादस्फूर्ती ढोल ताशा पथक, सामाजिक संस्था पथकातील वादक, एकता मित्र मंडळ लाईन आळी,पी. के. भाई ग्रुप व मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.




Be First to Comment