

कोपर (गव्हाण) :
गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे.एम. म्हात्रे कुटुंबीयांच्या रंजना बंगला, कोपर (गव्हाण) येथे लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. सात दिवसांच्या या उत्सवाचे औचित्य साधून भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० नंतर भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा असे निमंत्रण मा.नगराध्यक्ष श्री.जे.एम. म्हात्रे (चेअरमन, जे.एम. म्हात्रे इन्फ्रा प्रा. लि.) श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे (अध्यक्ष, जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था) यांच्याकडून करण्यात आले आहे.




Be First to Comment