Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या कोविड शिक्षण शुल्कनिती अभियानास प्रारंभ

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) #

कोविड – १९ च्या जागतिक महामारीमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळेच शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या नियमानुसार शैक्षणिक शुल्क आकारणी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने रायगडचे खासदार सुनिल तटकरे तसेच पालकमंत्री कु.आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रेरणेने तसेच विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतुन व कोकण विभाग प्रमुख किरण शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना शुल्कनीती अभियान मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे.

रोहा तालुक्यात देखील कोवीड शिक्षण शुल्कनीती अभियान राबविण्यात येत असून त्याचा प्रारंभ नागोठणे येथील भाएसोच्या डिप्लोमा इंजिनीरिंग कॉलेजला एक निवेदन देऊन करण्यात आला असल्याची माहिती रोहा तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष कु.अक्षय नागोठणेकर यांनी दिली. यावेळी अध्यक्ष कु.अक्षय नागोठणेकर, नागोठणे शहर अध्यक्ष कु.केतन भोय, सचिव कु.ओमकार लाड, सहसचिव कु.उमेर सांगाडे, संघटक कु.उदय कडू आदी पदाधिकारी उपस्थित होते. या अभियाना अंतर्गत कोएसोच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील अग्रवाल विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, भाएसोचे कनिष्ठ महाविद्यालयातही अशा प्रकारचे निवेदन देण्यात येणार असल्याचे अक्षय नागोठणेकर यांनी सांगितले.

कु. अक्षय नागोठणेकर यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये, शक्य असेल तेवढे शुल्क पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी कमी करावे, निश्चित केलेले शुल्क टप्प्या- टप्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी, कोणत्याही परीस्थितीत पालक कींवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये, त्याच बरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये या सर्व बाबींची अंमलबजावणी प्रत्येक शैक्षणिक संस्थेने केली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही असू असे शेवटी कु. अक्षय नागोठणेकर यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.