सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
भारत देश स्वतंत्र काळानंतर १५ ऑगस्ट२०२० हा भारतीय स्वतंत्र दिवस प्रथमच यावर्षी भारताच्या इतिहासात सर्व जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांनविना साजरा करण्यात येणार आहे. याबाबत रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या कडून सर्व पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत.
संपूर्ण जगभरात कोरोना संसर्गाची महामारी देशात व राज्यात त्याचा वाढत्या पादुर्भावामुळे गेली सहा महिने लॉकडाऊन व टाळेबंदीत शाळा कॉलेजेस बंद तर रेल्वे एसटी बसेस बंद तसेच शासकीय विभागातील विविध कर्मचारी या संसर्गाचा पादुर्भाव रोखण्यासाठी पाच ते दहा टक्केच कार्यरत होते त्यामुळे आज संपन्न होत असलेला स्वतंत्र दिनानिमित्ताने सदरच्या या लेखी निवेदनात ध्वजरोहनाचा कार्यक्रम हा सकाळी ८.३५ पूर्वी आयोजित करण्यात यावा.यामध्ये शाळेतील मुख्यध्यापक,१ शिक्षक,व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्यासह किमान ५ व्यक्ती ध्वजरोहन कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकतील अथवा राहतील.
यामध्ये सोशल डिस्टन्सचे पालन करून सर्वांसाठी मास्क लावने बंधनकारक आहे.ध्वजरोहनासाठी विद्यार्थ्यांना बोलवू नये.ध्वजरोहन कार्यक्रमातगर्दी होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे असे म्हटले आहे.






Be First to Comment