सुधागड तालुका मनसेचा दणका : चंदरगाव बौद्धवाडीतील धोकादायक विजेचा खांब तात्काळ बदलला !
ग्रामस्थांनी मानले मनसेचे आभार !
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील चंदरगाव ग्रामपंचायत हद्दीतील बौद्धवाडी येथील धोकादायक विजेच्या खांबाकडे विजवीतरण विभागाचे दुर्लक्ष झाले होते. अखेर सुधागड तालुका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खांब न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर येथील विद्युत खांब बसविण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी मनसेचे आभार मानले.
सुधागड तालुक्यातील कोणतेही गाव, आदिवासी वाडीत वीजसबंधीत धोकादायक स्थिती अथवा समस्या असतील त्या तत्काळ कळवा असे आवाहन मनसेने केले आहे.
सदर विजेचा खांब अनेक दिवसांपासून गंजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे तो कधीही पडून अपघात किंवा जिवितहानी होण्याचा धोका होता. ही बाब तेथील ग्रामस्थांनी मनसचे विभाग अध्यक्ष केवल चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर केवल चव्हाण व मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे वीज वितरण कार्यालय पाली येथे जावुन अभियंता गोवारी यांना दोन दिवसांत नवीन विदधुत खांब बसविण्यास सांगितला. त्यानंतर नवीन विदधुत खांब बसवण्यात आला.
सुधागड तालुक्यात अशाप्रकारे लोकवस्तीच्या ठिकाणी जुने, जर्जर व मोडकळीस आलेले धोकादायक विदधुत खांब, अथवा धोकादायक विदधुत वाहिन्या असल्यास त्वरित स्थानिक मनसेच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष सुनिल साठे, विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव, ग्रामपंचायत सदस्य मिलींद शेळके, जयेश पाटेकर, दिनेश चव्हाण, परेश वनगळे, संदीप जोध, राहूल यादव, वसंत वनगले, समिर पाटेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.







Be First to Comment