Press "Enter" to skip to content

सुधागड विद्या संकुल कळंबोली येथे ११ वी नवीन प्रवेश विद्यार्थ्यांचे स्वागत


कळंबोली : मनोज पाटील

सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सेक्टर १ ई , कळंबोली – पनवेल या ज्युनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २०२६ करिता नवीन प्रवेशित झालेल्या इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांचा जंगी स्वागत समारंभ सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी संपन्न झाला.

विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे , उपप्राचार्य संजय पाटील, सायन्स विभाग प्रमुख किशोर पाटील , कॉमर्स विभाग प्रमुख नजीर शेख , आर्ट्स विभाग प्रमुख अण्णासाहेब झिटे या यांच्या सह११ वी त प्रवेश घेतलेल्या एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांच्या शुभ हस्ते विद्यादेवी सरस्वती , सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमांचे पूजन , पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्युनियर कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख शितल शिंदे व सांस्कृतिक समितीतील सर्व सदस्य , इयत्ता ११ वी व १२ वी चे एकूण २४ वर्गांचे वर्गशिक्षक , ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

इयत्ता ११ वीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री.पालवे सरांच्या हस्ते गुलाबपुषे व चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी १२ वी च्या मुलीनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत , ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात केले गेले , शिवाय ११ वी च्या प्रत्येक वर्गासमोर रांगोळ्या आणि फुगे आणि फुलांची सजावट करण्यात आलेली होती तिथेही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांनी केलेली होती. १२ च्या निवडक विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यालयाचे प्रशासन , शिक्षण , शिक्षक आणि शिस्त याबाबत सविस्तर प्रास्ताविक भाषणे केलीत : काही विद्यार्थ्यांनी कवितेतून आपल्या कॉलेजबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात.

इयत्ता ११ वी १२वी चे वर्गशिक्षक आणि सांस्कृतिक समिती च्या मार्गदर्शनाने ११ वी विद्यार्थ्यांच्या जंगी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते. सांस्कृतिक विभागातील महिला शिक्षकांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ रेखीव रांगोळ्या रेखाटल्या होत्या , मुख्य प्रवेशद्वारावर फुग्यांचे तोरण बांधले होते. एकंदरीत इयत्ता ११ वी त प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या पहिल्याच दिवशी रांगोळ्यांच्या , फुग्यांचा देखणा साज देऊन विविधरंगी आकर्षण तयार केले होते ; साथीला ढोल ताशांचा गजर होताच . अशा उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचा कॉलेजचा पहिला दिवस सुरू झाला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.