Press "Enter" to skip to content

सिटी बेलच्या बातमीची घेतली उरण पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी दखल


सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी #

उरण नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने पालिका प्रवेश द्वारा समोर रस्त्याखाली पाणी पुरवठा नियंत्रक करण्यासाठी लावलेल्या व्हाॅलची दुरूस्ती करण्यासाठी अनेक दिवस खड्डा खोदला होता.

या खड्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका या मथळ्याखाली १२ ऑगस्ट २०२० रोजी सिटी बेल लाईव्ह मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन नुकतेच उरण नगर परिषदेची सूत्र हाती घेतलेले मुख्य अधिकारी संतोष माळी यांनी त्वरित पाणी पुरवठा कर्मचार्‍यांना आदेश देवून खोदकाम केलेला खड्डा त्वरित भरून काढण्याचे आदेश दिले. पालिकेत आलेल्या अशा कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांना व सिटी बेल लाइव्ह ला उरण मधील नागरिक धन्यवाद देत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.