Press "Enter" to skip to content

माथेरान मधील घोडेवाल्यांवर उपासमारीची वेळ

पर्यटक सुरु होईपर्यंत शासनाने आर्थिक मदत करावी : धर्मेंद्र मोरे यांची मागणी

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे #

महाराष्ट्रात अनेक थंड हवेचे ठिकाण आहेत. मात्र मुंबई – पुण्याचे मध्य असलेल्या कर्जत तालुक्यातील माथेरान हे थंड हवेचे गिरीस्थान सर्वांचेच आकर्षण आहे .येथे राज्यातून अनेक पर्यटक तिन्ही सिझनमध्ये मनमुराद आनंद लुटण्यास येतात. या सर्वांचीच आवड म्हणजे घोडेसवारी. मात्र २५ मार्च २०२० पासून कोरोना प्रादुर्भावामुळे देशभरात लाॅकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे देशभरातील अनेक पर्यटन स्थळे बंद झाली.

माथेरान मध्ये सुद्धा कोरोना लाॅकडाऊनमुळे पर्यटक माथेरानला येणं बंद झालं. त्यामुळे माथेरानमधील पर्यटनावर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय बंद झाले आहेत. याचा सर्वात मोठा फटका घोडेवाल्यांना बसला आहे. घोडेवालेंची कमाई बंद झाल्यामुळे कुटुंब चालवणं मुश्कील झालं आहे. त्यात घोड्यांना लागणारं खाद्य सुद्धा उपलब्ध करायचं आहे. यामुळे घोडेवाल्यांची परिस्थिती बिकट होवुन बसली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाने देखील त्यांच्याकडे पाठ फिरविली असल्याने शासनाला जागृत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने माथेरानमध्ये पर्यटक सुरु होईपर्यंत घोडेवाल्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांनी केली .

सदरचे निवेदन मा . मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले .
सदर निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, जिल्हा पदधिकारी सुनिल गायकवाड़ , शहर सचिव लोकेश यादवआदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.