सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ४२ जण सापडले आहेत. तर १३ जणांना घरी सोडण्यात आले असून १ जण मयत झाले आहेत.
आज एकूण पॉझिटीव्ह १११७, उपचार करून बरे झालेले ८७६, उपचार घेणारे १९२, मयत ४९ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज चिरनेर कातळपाडा १, जेएनपीटी ७, नागाव २, करंजा २, जांभूळपाडा १,धुतुम १, केगाव १, चिरनेर १, उरण ५, केगाव आवेडा १, आवरे १, द्रोणागिरी १, नागाव १, केगाव १, म्हातवली १, ओमकार कॉलनी कुंभारवाडा १, मुळेखंड तेलीपाडा १, बोकडविरा २, दिघोडे १, मोरा कोळीवाडा १, द्रोणागिरी १, करंजा कासवलेपाडा १, सीआयएसएफ कॉलनी १, केगाव १, नागाव म्हातवली ३, बोरी १, गोवठणे १ असे एकूण ४२ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत.आज पर्यंत हा पॉझिटीव्ह आकडा मोठा असल्याने उरणकरांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
चिरनेर कातळपाडा १, जेएनपीटी ३, नागाव २, करंजा २, जांभुळपाडा १, धुतुम १, केगाव १, उरण १ असे एकूण १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर गोवठणे येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये पॉझिटीव्ह व मयताचा आकडा वाढू लागला आहे. आजतर सर्वाधिक ४२ जण पॉझिटीव्ह आल्याने उरणमध्ये हाहाकार माजला आहे. उद्या स्वातंत्र्य दिन साजरा करताना जनतेच्या मनात भीतीचे वातावरण असणार आहे.






Be First to Comment