पनवेल : मनोज पाटील
३ऑगष्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ ,महाराष्ट्र राज्याची कोकण विभागीय संघटनेची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेसाठी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर तसेच राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे उपस्थित होते. या सभेसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, विभागीय प्रतिनिधी आणि राज्य प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी राज्य प्रतिनिधी विद्याधर पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी प्रास्ताविक केले तर कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी मार्गदर्शन केले. सभेत खालीलप्रमाणे कोकण विभागीय कार्यकारणी गठीत करण्यात आली. या वेळी कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष दत्तराव जाधव – रत्नागिरी ,सचिवपदी रंजना पाटील-मुंबई, सहसचिवपदी प्रेरणा शेळवणे – ठाणे, उपाध्यक्षपदी भाऊसाहेब शेट्ये – पालघर व ज्योती दीपक अवघडे – रायगड, कार्याध्यक्ष – आनंद जाधव- सिंधुदुर्ग, कोषाध्यक्ष विजयकुमार देसले -ठाणे, विभाग संपर्कप्रमुख – ज्योती मधुकर नेटवटे व
सुहास गायकवाड -रत्नागिरी, प्रसिध्दी प्रमुख – मनोज पाटील – रायगड व स्नेहलता राणे -सिंधुदुर्ग, मार्गदर्शक सल्लागार – निवास शेवाळे -मुंबई, महिला प्रतिनिधी – वर्षा चिंतामण दळवी -रायगड, शिल्पा वनमाळी -पालघर, संघटक – उदय गोसावी -सिंधुदुर्ग, शिवाजी पाटील -रत्नागिरी, प्रकाश गोंधळी -ठाणे, संजय पाटील -पालघर,
विभागीय नेते वकीलप्रसाद पांडे मुंबई, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या सभेच्या वेळी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे राज्य प्रतिनिधी विद्याधर पाटील व कोकण अध्यक्ष संतोष जाधव यांनी सांगितले.






Be First to Comment