सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे #
निसर्ग चक्रीवादळाच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कर्जतमधील जनजीवन विस्कळीत झाले होते . नागरिकांचा जीव की प्राण असलेल्या विजेच्या सामुग्रीची तीन तेरा वाजल्यामुळे अनेक ठिकाणची वीज पूर्ववत झाली नाही. सततच्या वीज जाण्याने कर्जतकरांना त्याचा नाहक त्रास होत असल्याने आत्ताच व्यवसाय सुरू झाले असताना विजेअभावी आर्थिक उलाढाल घसरत असल्याने व पुढे येणारे गणेशोत्सव व इतर समस्यांनी ग्रासलेल्या कर्जतच्या वीज कंपनी कार्यालयावर भारतीय जनता पार्टीने धडक देऊन तातडीने समस्या सोडवाव्या अन्यथा आपल्या बेजबाबदार कामांमुळे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देण्यात आला .
आज भारतीय जनता पार्टी कर्जतच्या वतीने कर्जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांचे कार्यालयात जाऊन निवेदन देऊन जनतेच्या विविध तक्रारीचे ताबडतोब निवारण झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली . यावेळी त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला .
सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे तो सुरळीत झाला पाहिजे , वेळेवर आणि रिडींग प्रमाणे बिल द्यावे , वाढीव बिल कमी करून मिळावी , येणारे गणेशोत्सव लक्षात घेऊन त्यापूर्वी ह्या सर्वं मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला . सदरचे निवेदन उपकार्यकारी अभियंता घुले यांना देण्यात आले .
या प्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , किसान मोर्चा राज्य चिटणीस सुनिल गोगटे , जिल्हा सचिव दीपक बेहेरे , उदयोग मंच जिल्हा पदाधिकारी मंदार मेहेंदळे , नगरसेवक बळवंत घुमरे , नगरसेविका विशाखा जिनगरे , नगरसेविका स्वामीनी मांजरे , गायत्री परांजपे , दिनेश भरकले , समीर घरलुटे , मिलिंद खंडागळे , विशाल सुर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .






Be First to Comment