Press "Enter" to skip to content

आता दुकानदारांना रोज दुकान उघडण्याचे स्वातंत्र्य


सम आणि विषम तारखेचा पनवेल मनपाचा निर्णय मागे : सकाळी ९ सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुले राहणार

आमदार प्रशांत ठाकूर व नगरसेवक संजय भोपी यांच्या मागणीला यश

सिटी बेल लाइव्ह / पनवेल(प्रतिनिधी)

पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने शनिवारी स्वातंत्र्य दिनापासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व प्रभाग समिती सभापती, नगरसेवक संजय भोपी यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे.        

पनवेल महानगरपालिकेने मिशन बिगीन अगेन नुसार हद्दीतील दुकानांना सम विषम तारखेला परवानगी देण्यात आली होती. दिवसाआड पद्धतीमुळे व्यवसाय होत नसल्याने व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे नियमित  व्यवसाय करण्यास मुभा देण्याची लेखी मागणी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर व नगरसेवक संजय भोपी यांनी केली होती. त्याचबरोबर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. तसेच समन्वय बैठकीत या मुद्द्यावर जोर देऊन पाठपुरावा केला होता.

त्यांच्या मागणीला आणि सातत्यपुर्ण पाठपुराव्याला यश आले असून शनिवारी स्वातंत्र्य दिना पासून सर्व दुकान सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि तसे आदेश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहेत.
         

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले होते कि,  कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेमार्फत ३ जुलै पासून पुन्हा लॉकडाऊन जाहिर झाला. टाळेबंदी मुळे दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होते. त्याचे  उद्योजक व व्यापाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले.  १ ऑगस्टपासून लॉकडाऊनचे नियम जाहिर करताना दररोज सम-विषम तारखेप्रमाणे छोटया-मोठया व्यापाऱ्यांची दुकाने सुरू ठेवलेली होती . परंतू पनवेल मधील डी-मार्ट तसेच सुपर व मिनी मार्केट मधील व्यवहार लॉकडाऊनमधील नियमांचा भंग करून दररोज सुरळीतपणे सुरू होते. ज्याप्रमाणे डी-मार्ट व सुपर मिनी मार्केट सुरू आहेत. त्याचप्रमाणे सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून महापालिका हद्दीतील छोटया-मोठया उद्योगधंद्यांना देखील दररोज व्यवहार करण्याची परवानगी मिळावी अशी संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी मागणी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घ्यावी या आशयाचे पत्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले होते. सदर मागणी अमान्य केल्यास व्यापाऱ्यांनी आंदोलनाचे पाऊल उचलण्याचे ठरवले असल्याचेही पत्रास सांगण्यात आले होते. व्यवसायिक व व्यापाऱ्यांची मागणी ही रास्त असल्याने भाजप कडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येईल असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला होता. अशाच प्रकारचे निवेदन नगरसेवक संजय भोपी यांनीही आयुक्तांना दिले होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतही या मुद्द्यावर त्यांनी भर दिला होता. पुणे महानगरपालिकेने दिलेल्या गाईडलाईन्सचा अभ्यास करून याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार शनिवार दिनांक १५ ऑगस्टपासून दोन्ही बाजूचे दुकाने नियमित सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी गर्दी टाळणे तसेच सामाजिक अंतर पाळणे याशिवाय इतर नियम व अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. दुकानदारांनी त्याचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. कंटेनमेंट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच नियमावली असणार आहे असल्याचे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी छोट्या मोठ्या उद्योजक व व्यापारांच्या व्यथा मांडून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.