सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
जंगलात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आढळतात, तेवढ्याच प्रमाणात रानभाज्या देखील आढळत असून त्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने त्याचे सेवन सर्वांनी केले पाहिजे असे आवाहन कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.कर्जत तालुका कृषी विभागाच्यावतीने कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आलेल्या राणभाज्या महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी थोरवे बोलत होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या या अत्यंत उपयुक्त आहे. कर्जत तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुकास्तरावर रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील महिला आणि अन्य यांच्याकडून लावण्यात आलेल्या पन्नास स्टाॅलचा सहभाग असलेल्या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी शितल शेवाळे, मंडळ अधिकारी धनाजी सरडे ,प्रवीण जाधव चौगुले, कृषी पर्यवेक्षक सचिन केणे आदी उपस्थित होते






Be First to Comment