Press "Enter" to skip to content

पत्रकारांना इन्श्युरन्सचेही होणार वाटप

दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त दादर शाळेस वॉटर कुलर व फिल्टर भेट कार्यक्रमाचे आयोजन

पेण-दि.31 (प्रतिनिधी)

पेणचे समाजसेवक तथा वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे यांच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय दादर शाळेतील विदयार्थ्यांना वॉटर कुलर व वॉटर फिल्टर भेट देण्यात येणार आहे. पेण मधील पत्रकारांना प्रत्येकी 5 लाख रूपयेंचा इन्श्युरन्सही देण्यात येणार आहे. शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता दादर गाव येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, सुधागड एज्युकेश सोसायटी पालीच्या अध्यक्षा गीता पालरेचा, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, दादर सागरी पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, साधना कांबळे, माध्यमिक विद्यालय दादर प्राचार्य डी.एस.पाटील, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, विनायक पाटील, स्वप्नील पाटील, राज कडू आदीं मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वक्रतुंड मित्र मंडळ पेणच्या संयोजनातून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय दादर शाळेतील विदयार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून वॉटर कुलर व वॉटर फिल्टर भेट देण्यात येणार आहे. तसेच जनतेला भेडसावणारे अनेक प्रश्न आपल्या लेखणीतून सोडविणारे पेणचे पत्रकार यांना देखील प्रत्येकी 5 लाख रुपयांचा अपघाती विमा देण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.