सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे #
चौक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेनेचे जयसिंग देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विभागप्रमुख सुधीर ठोंबरे व जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे या ग्रामपंचायतवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.स्थानिक राजकारणात ठरल्याप्रमाणे उपसरपंच सुरेश घाग यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर जयसिंग देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.
विभागप्रमुख सुधीरशेठ ठोंबरे,जिप.सदस्य मोतीराम ठोंबरे,सरपंच किशोरी थळकर,सुरेश घाग,दत्ता मांडे,लता कोंडीलकर,प्राची आंबवणे,ग्रामविकास अधिकारी जाधव,वासांबे रसायनी शिवसेना विभागप्रमुख अजित सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.
चौक ग्रामपंचायत कोरोनामुक्त होण्यासाठी व ग्रामपंचायत चा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे उपसरपंच जयसिंगराव देशमुख यांनी सांगितले.






Be First to Comment