Press "Enter" to skip to content

युवासेना नागोठणेचे वीज वितरण कंपनीला खंडित वीजपुरवठया बद्दल निवेदन

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

नागोठणे शहरासह नागोठणे ग्रामीण विभागात कोणत्याही प्रकारे पाऊस, वारा नसतांना देखील सर्वत्र वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनता त्रस्त झाली आहे. तसेच काही दिवसांवर गौरी गणपती सण येत आहेत त्यामुळे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्या बाबत आज युवासेना जिल्हा अधिकारी सुधीर ढाणे यांच्या सोबत रोहा उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर सालुंखे, रोहा तालुका समन्वयक शेखर जोगत, युवासेना रोहा तालुका चिटणीस आकाश मढवी, युवासेना नागोठणे उपविभाग अधिकारी कु.अमोल ताडकर, युवासेना नागोठणे शाखा अधिकारी कु. दिनेश वादळ. युवासैनिक अल्वीन नाकते, अशिष ताड़कर, अखिल ताडकर यांच्या उपस्थित वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांना नागोठणे विभाग युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवापुर्वी वीजपुरवठा नियमित करण्यात येईल असे आश्वासन यावेळी गायकवाड यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.