Press "Enter" to skip to content

चाकरमान्यांसाठी लावण्यात आलेल्या नियमावलीच्या बॅनरवर कोणी काढला राग ?

मुरूड तालुक्यातील वळके ग्राम पंचायत हद्दीत बॅनर फाडले

सिटी बेल लाइव्ह / मुरूड-प्रतिनिधी ( विकास मेहेतर )


मुरूड तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत वळके हद्दीमधील शासनाच्या नियमांचे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमानी यांच्यासाठी जण जागृती करणारे लावण्यात आलेले बॅनर काही विरोधी समाज कंटकांनी फाडले.

ग्रामपंचायत वळके यांच्या माध्यमातून सरपंच किशोर नथुराम काजारे यांच्या नेतृत्वाखाली येसदे , शिरगाव , वळके , सतिर्डे , ताडगाव बुद्धावाडी आणि ताडवाडी या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या चाकरमानी यांच्यासाठी शासनाने जाहीर केलेली नियमावली यांचा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते . त्यामधील ताडगाव गावाजवळील लावण्यात आलेला बॅनर काही विरोधी समाज कंटकांकडून फाडण्यात आले.

सदरची घटना ही दिनांक 13/8/2020 रोजी घडली असून , जे कोणी हे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय असून सरपंच किशोर नथुराम काजारे यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे.

विरोधकांना त्यांना एकच सांगणं आहे की, जे पण काही नियम लागू झाले आहेत ते संपूर्ण रायगड साठी लागू झाले आहेत आणि ग्राम पंचायत वळके हद्दीत येणाऱ्या 7 गावांच्या दिनांक 2 ऑगष्ट रोजी झालेल्या मिटिंग मध्ये सर्व जनतेच्या समोर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रकानुसार जे नियम लागू झालेत त्या बद्दल माहिती देण्यात आली आहे.  काही विरोधी समाज कंटकांकडून हे कृत्य करण्यात आलं आहे. माझे विरोधकांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केलात तरी माझ्या हातून चांगलंच काम होत जाणार आहे आणि आपण दाखविलेल्या धाडसाबद्दल आपलं अभिनंदन !                     सरपंच-किशोर नथुराम काजारे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.