Press "Enter" to skip to content

कामोठे येथील धक्कादायक घटना

मुलगा रोज दारू पिऊन यायचा, आई वडिलांशी भांडायचा ! अखेर.. संतप्त वडिलांनी जे केले ते वाचून व्हाल थक्क !

संतप्त पित्याचे मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार

पनवेल दि. १६ ( वार्ताहर ) : दारूच्या नशेत आई-वडिलांशी सतत भांडण करणाऱ्या मुलाच्या गळ्यावर त्याच्या वडिलांनी रागाच्या भरात ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कामोठेत घडली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी मुलावर हल्ला करणाऱ्या पित्याविरोधात – गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

अमोल जाधव (३३) असे – मुलाचे नाव असून, त्याच्यावर ब्लेडने वार करणाऱ्या त्याच्या पित्याचे नाव रवींद्र जाधव (६८) असे आहे. अमोल याला दारूचे गंभीर व्यसन जडल्याने तो दररोज दारू पिऊन घरात आई-वडिलांशी भांडण काढत होता. तसेच त्यांना मारहाणही करीत होता. त्यामुळे त्याच्या त्रासाला त्याचे आई-वडील कंटाळले होते. वडील जाधव हे रात्री वॉचमन म्हणून काम करतात. ते रात्रीपाळी करून सकाळी घरी आंले होते. या वेळी त्यांची पत्नी घरकामासाठी निघून गेली. तर, अमोल पलंगावर झोपला होता.दरम्यान रवींद्र हे जेवण घेण्यासाठी किचनमध्ये गेले असता, भांड्यांचा आवाज झाल्याने अमोल जागा झाला. त्यावर दारूच्या नशेत असलेल्या अमोल याने रवींद्र यांना घरातून निघून जा, असे जोरजारात सांगून त्यांना शिवीगाळ करू लागला त्यानंतर त्याने रवींद्र यांना मारहाणही केली.

या वेळी मी घराचे भाडे भरतोय, तूच घराबाहेर जा, असे रवींद्र यांनी अमोलला बजावले. त्यामुळे चिडलेल्या अमोलने त्यांना पुन्हा मारहाण सुरू केली. त्यामुळे चिडलेल्या रवींद्र यांनी मागचापुढचा कसलाच विचार न करता घरातील दाढी करण्याचे ब्लेड उचलले व अमोलच्या गळ्यावर वार करून त्याला जखमी केले. या घटनेत अमोल गंभीर जखमी झाल्याने त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी रवींद्र यांच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.