Press "Enter" to skip to content

पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अंतोरे ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी आरक्षित

पेण, ता. १५ (वार्ताहर) : पेण तालुक्याच्या ६४ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत दि. १५ रोजी महडा येथील गुरुकुल शाळेच्या सभागृहात प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसिलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.

यावेळी तालुक्यात एकमेव अंतोरे ग्रामपंचायत ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली असून यातील १४ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी त्यापैकी खुल्या गटासाठी गागोदे खुर्द, जोहे, काळेश्री, कणे, कळवे, मसद बुद्रुक, दिव तर दूरशेत, हमरापुर, आमटेम, वाशी, वढाव, जिते, सोनखार या सात ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.यासह नागरिकांचा मागास प्रवर्ग या खुल्या गटासाठी आंबेघर, शेडाशी, वडखळ, मळेघर, बेणसे, खरोशी, कोपर, बोरगाव या आठ ग्रामपंचायती तर यातील महिला प्रवर्गासाठी वरवणे, वरेडी, शिर्की, रोडे, रावे, सापोली, बेलवडे बुद्रुक, कामार्ली, जावळी या नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा आरक्षण जाहीर करण्यात आला आहे.

यामधील खुला प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायत कासू, कुहिरे, दादर, बोरी, काराव, निगडे, दुष्मी, बळवली, तरणखोप, करंबेली छत्तीशी, पाबळ, महलमि-या डोंगर, वरसई, मुंढानी, आंबिवली, बोर्झे या सोळा ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला असून यातील महिला प्रवर्गासाठी जिर्णे, कांदळे, झोतिरपाडा, निधवली, खारपाले, डोलवी, कोलेटी, पाटणोली, कोप्रोली, उंबर्डे, शिहू, सावरसई, करोटी, वाशिवली, वरप, वाकरुळ या सोळा ग्रामपंचायतींचा समावेश आहे.त्यामुळे पेण तालुक्यातील एकूण ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.

तर यावेळी काही ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून जाहीर करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.