लॉकडाउन मुळे आर्थिक संकटात अडकलेल्या व्यापार्यांना शिवसेनेने मिळवून दिला न्याय
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या कार्याचा झंझावात सुरूच आहे. आज पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने शनिवारी स्वातंत्र्य दिनापासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी बबनदादा पाटील यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे.
देशभरात २३ मार्च पासून लागू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक तुटवड्यास सामोरे जावे लागले आहे. ह्या विषयाला अनुसरून पनवेलमधील व्यापाऱ्यांनी रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील ह्यांच्याकडे इतर महानगरपालिकांप्रमाणेच सम-विषम धोरण रद्द करण्यात यावे अशा मागणीचे पत्र दिले होते. त्यानुसार बबनदादा पाटील ह्यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यापाऱ्यांची अडचण पोहचवली होती व व्यापारी संघटनेस ह्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची मागणी केली होती.
व्यापार्यांच्या अडचणी संदर्भातील ह्याच मुद्द्यावर बबनदादा पाटिल ह्यांनी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजूभाई सचदेव, तसेच पदाधिकारी
मनोजभाई देडिया,
सचिन बहाडकर आणि अतुल पलन ह्यांच्यासह आयुक्त सुधाकर देशमुख ह्यांची भेट घेऊन सदर विषयावर चर्चा केलेली व व्यापाऱ्यांच्या मागण्या आयुक्तांसमोर ठेवल्या होत्या.
आज त्यानुसार महापालिकेने व्यापार्यांना सकाळी ९:०० ते संध्याकाळी ७:०० पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. सदर विषयाची तातडीने दखल घेत शिवसेनेने न्याय मिळवून दिल्याबद्दल पनवेलमधील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पनवेल महानगरपालिका आयुक्त व शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील ह्यांचे आभार मानले आहेत.
आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार जोमाने काम करीत आहे. उध्दव साहेबांसारख्या कणखर नेतृत्वाचा फायदा घेत रायगड जिल्ह्यासह पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीचं मी प्रामाणिक प्रयत्न करीत असतो.
बबनदादा पाटील, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार






Be First to Comment