Press "Enter" to skip to content

शिवशक्ती मित्र मंडळाचे पहिले पाऊल : वर्गणी मागणार नाही

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

या वर्षी करोनाचा जगात हादरवून टाकणारा विषय महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रात अथवा जगभरात होणाऱ्या सर्व संघटीत कार्यक्रमांवर व सणांवर कायद्याने नियंत्रण आणण्यात आलेले असून, शिवशक्ती मित्र मंडळाने आपल्या कार्यक्रमात एक विशेष पाऊल उचलून कार्यक्रमावर नियंत्रण आणण्याचे ठरविले आहे. शिवशक्ती मित्र मंडळाचे संस्थापक व आधारस्तंभ रमेश गुडेकर यांच्या नेतृत्वाखाली होणारा गौरा-गणपती हा उत्सव दरवर्षी प्रमाणे न होता सरकारने जे कार्यक्रमाचे धोरण आखले आहे, त्याप्रमाणे कार्यक्रम करण्याचे ठरविले आहे. तसेच या वर्षी गौरा-गणपतीचा उत्सव सभासदांच्या वर्गणीतून करण्याचे योजिले आहे व इतर दुकानदार अथवा अन्य देयकाकडून देणगी घेण्याचे टाळले आहे.

करोनाच्या सुरवातीच्या काळात मार्च- 2020 मध्यें होळी निमित्त लोकांच्या सुरक्षेतेसाठी माक्स चे वाटप करण्यात आले होते, तसेच मागच्या वर्षी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या सैनिकांना आर्थिक मदत करण्यात आली. दरवर्षी शिवशक्ती मित्र मंडळ कोणत्या ना कोणत्याप्रकारे गरीब व गरजूंना मदत करत असते.

विद्याथ्यांना वह्या व कपड्यांचे वाटप तसेच अनाथ आश्रम व वृद्ध आश्रम येथे जाऊन वस्तूरूपे सामानाचे वाटप केले जाते. शिवशक्ती मित्र मंडळ हे नेहमी मदत करण्यास तत्पर असते, याचे संपूर्ण श्रेय मंडळाचे सभासद व कार्यकर्त्यांना जाते. शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष गोविंदा सुतार, उपाध्यक्ष समीर बताले, अरुण ठाकूर, खंडेश धनावडे, पंकज पडवळ, समीर कदम, सचिन कदम, प्रवीण पोवार, प्रशांत नरसाळे, नानू वाघे, संतोष तळेकर, देवेन तळेकर, अनिकेत जाधव, निलेश समेळ, निखील जाधव, संदीप पाटील, अशोक सावंत, अतुल जैतपाळ, संदीप देशमुख, नितीन मनोरे, संतोष बताले, नरेंद्र नरसाळे, अभिजित चव्हाण, अमित चव्हाण, राजा सुतार, बबन सुतार, राहुल कदम, ऋषी कचरे, बाळा वैद्य, प्रतिक पोवार, प्रफुल भाग्यवंत व इतर सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या मार्गदर्शनाखाली मेहनतीने कामे पार पाडतात तसेच हे सर्वजण एकप्रकारचे उत्तम कलाकार असून नेहमी आपली कलाकृती दाखवून कार्याक्रमाची शोभा वाढवतात आणि सर्वत्र मंडळाचे नाव करतात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.