सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची संपन्न झाली. यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांनी रायगड जिल्हा अध्यक्षपदी गिरीश भोपी यांची दुसऱ्यांदा निवड करुन त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे.
सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे






Be First to Comment