Press "Enter" to skip to content

श्री नवनाथ मंदिर पनवेल येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

पनवेल : प्रतिनिधी

रेल्वे स्टेशन रोड येथील श्री नवनाथ मंदिर पनवेल येथे सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय भक्तीमय वातावरणात साजरा झाला. सुमारे १९७९ पासून श्री नवनाथ मंदिर अस्तित्वात आहे. गुरुपौर्णिमेच्या सप्ताह सोहळ्यात आठ दिवस भजन व निरंतर महाप्रसादाचे आयोजन मंदिरात असते. मठाधिपती गुरुवर्य श्री विजय महाराज पानसरे सर्व भक्तांचे मनोभावे स्वागत करतात. मंदिरातील भक्तांनी अतिशय सुरेख अशा चलचित्राने मंदिर गाभाऱ्यास सजवले.

प्रातः सकाळी मंदिरातील देवांचा अभिषेक करून झाल्यावर होम हवन कार्य पार पडते. संध्याकाळपासून भजनी मंडळाचे सुरेल भजन सुरू होते. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन घेऊन झाल्यावर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन मंदिर व्यवस्थापनाकडून केले जाते. सुमारे २४०० ते २५०० भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. गुरुवर्य श्री विजय महाराज पानसरे महिन्याच्या दर महिन्याच्या पौर्णिमेला देखील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करत असतात.
वर्षभर विविध देवस्थानच्या पालख्या या मंदिरात आश्रयासाठी थांबत असतात त्यांच्या महाप्रसादाची देखील व्यवस्था मंदिराकडून केली जाते. दरवर्षी साधारण ३५ ते ३६ विविध धार्मिक सोहळे मंदिरात साजरे केले जातात.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.