Press "Enter" to skip to content

गोल्डन अपाँरच्युनिटिज आँनलाईन काव्यस्पर्धेत अंकुश जाधवचे सुयश


सिटी बेल लाइव्ह / रोहा (समीर बामुगडे)

गोल्डन अपाँरच्युनिटिज आयोजित समाजसेवक नरेंद्र लक्षण लोहार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आँनलाईन काव्यस्पर्धेत रायगडचे सुपुत्र अंकुश जाधव यांनी द्वितीय क्र.संपादित करून सुयश प्राप्त केले आहे.

यामिनी लोहार यांनी विशेष मेहनत घेऊन संपन्न झालेल्या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे,पूणे,नांदेड,पालघर,जळगाव, अमरावती, रत्नागिरी, रायगड,सोलापूर, बीड, सूरत,रायपूर,औरंगाबाद, कोल्हापूर,सोलापूर, चंद्रपूर,सांगली आदी जिल्ह्यातून एकूण ९५ स्पर्धक सहभागी झाले होते.स्पर्धेचे परीक्षण भावना विभूते (शिक्षिका)सांगली यांनी केले.स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांचे आँनलाईव्ह सत्र घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तर विजेत्या सर्व स्पर्धकांना आँनलाईव्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.नरेंद्र लोहार, यामिनी लोहार तसेच गोल्डन अपाँरच्युनिटिज टिमने विजेत्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.
रायगडचे सुपुत्र अंकुश जाधव यांनी संपादित केलेल्या या सुयशाबद्दल संपुर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाघा वर्षाव होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.