
“शिव छत्रपती – स्वारी – बसरूर” अफजलखानाचे पोट आणि शाहिस्तेखानाचे बोट यात हरवलेल्या, शिव छत्रपतींच्या आयुष्यातील एकमेव आरमारी स्वारीची ही कहाणी !
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665 मध्ये बसरूर या शहरावर समुद्रमार्गे आरमार मोहीम काढून हल्ला केला.
डोंगरावरचा राजा पाण्यात उतरलाय.. आता कुठे जायचं, हे तुमचं तुम्ही ठरवा, अशी धास्ती घेतलेल्या पोर्तुगीजांना अक्षरशः वेड्यात काढत छत्रपती बसरूरला पोचले, तिथल्या अत्याचारी शक्तींना कायमची अद्दल घडवली आणि अफाट संपत्ती घेऊन स्वराज्यात परत आले..
सभासद बखर सांगते, “दोन कोटींच्या आसपास संपत्ती स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाली.” सुरतेनंतर स्वराज्यासाठी सर्वात जास्त धन आलं ते बसरूर वरून. ह्यात अतिशयोक्ती असली तरीही ह्या मोहिमेच्या भव्यतेची आपल्याला सहज कल्पना येईल.
सिंधुदुर्ग जवळील मालोंड येथील ‘गडनदीतून’ सुरू झालेला गलबतांचा हा प्रवास पोर्तुगिजांची राजधानी गोवा ओलांडून कर्नाटकातील बसरुर शहरावर धडक देता झाला आणि पुढे सुरू झाला अग्नितांडव.
ही मोहीम म्हणजे फक्त विजय नव्हे तर मराठा साम्राज्याच्या आरमारी सामर्थ्याचे जाहीर प्रदर्शन होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतृत्व केलेली हि एकमेव आरमारी मोहीम, पुन्हा अशी एकही मोहीम का झाली नाही ?
असं काय घडलं की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः बसरूरवर चालून जावं लागलं?
भर समुद्रात सिद्दी, इंग्रज, डच आणि पोर्तुगीजांचे सैन्य असताना खुद्द छत्रपती एवढ्या लांब जाऊन कसे पोहचले?
हे बसरूर नक्की काय प्रकरण आहे?
या स्वारीने स्वराज्याचा काय फायदा झाला?
ही बसरूर स्वारी म्हणजे नक्की काय प्रकार आहे?
या मोहिमेचे इतिहासात किती महत्व आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी आणि बसरूरच्या मोहिमेवर संपूर्ण प्रकाश टाकणारी एकमेव ऐतिहासिक कादंबरी.
शिव छत्रपती – स्वारी बसरुर
लेखक – अभिषेक कुंभार
प्रकाशक – दक्खन पब्लिशिंग हाऊस
पाने – 274
~किंमत 400 रु,~
सवलत किंमत 350 रु –
कुरिअर खर्च मोफत
एकूण 350 रू
Google Pay/ Phone Pe
The Book Distributor
8999360416
पेमेंट केल्यावर वरील नंबर वर एक स्क्रीनशॉट पाठवावा




Be First to Comment