Press "Enter" to skip to content

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल काँग्रेस व पनवेल शहर जिल्हा युवक कॉंग्रेस तर्फे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पनवेल, दि. 19 जून २०२६ रोजी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल काँग्रेस व पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षण, हरित विकास आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, विधी सेलचे जिल्हाध्यक्ष के. एस. पाटील, नगरसेविका लीला कातकरी, नगरसेवक लतीफ शेख, नगरसेवक जनार्दन पाटील, महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, इशिका सुधीजा, खांदा शहराध्यक्ष जयवंत देशमुख, सुधीर मोरे, पर्यावरण सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष राजू पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजीत पाटील, प्रशांत पारवे,महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया उपाध्यक्ष अभिजित पाटील, मेघनाथ पाटील, समीर पठाण, रवी राजीवडे, शाहीद मुल्ला, राज पाटील, सुजित पाटील, नीता शेनॉय, गुलजार म्हात्रे, मनोज बिराजदार, कामोठे शहराध्यक्ष जयेश लोखंडे, पनवेल शहराध्यक्ष डॉ. अमित दवे, सुनंदा घरत, उत्तम पाटील, प्रदीप बरगल, विलास म्हात्रे यांच्यासह पनवेल काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी “भविष्यातील सुजलाम-सुफलाम पर्यावरणासाठी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी झाडे लावणे व ती जगवणे हाच खरा वाढदिवसाचा संकल्प आहे,” असा निर्धार व्यक्त केला.

हा वृक्षारोपण उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.