Press "Enter" to skip to content

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये फाउंडेशन कोर्सचे उद्घाटन

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.

या वेळी आयोजित सेमिनारची सुरुवात राज अलोनी यांनी पालकांच्या प्रमुख चिंता, जसे की, कोणता बोर्ड निवडायचा आणि कधी निवडायचा तसेच कोचिंग सेंटरमधील एकात्मिक वर्ग आणि शाळांमधील फरक यावर चर्चासत्राने झाली. त्यानंतर एकात्मिक अभ्यासात अडचणी येणार्‍या विद्यार्थ्यांना शाळा कशी मदत करते हे स्पष्ट करत वरिष्ठ माध्यमिक समन्वयक इफत काटे यांनी जेईई आणि नीट परीक्षांबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले. या वेळी विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि स्पर्धात्मक प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची वृत्ती वाढवण्यासाठी शाळेने सुरू असलेल्या उपक्रमांवरही भर देण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, संचालक अर्चना ठाकूर, सदस्य राहुल घरत, आयआयटीयन हबचे संस्थापक डॉ. सौरभ प्रियदर्शी, डॉ. रजनीश कुमार आदी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पालकांना त्यांच्या मुलांना शैक्षणिक उत्कृष्टतेच्या प्रवासात पाठिंबा देण्यास आणि मार्गदर्शन करण्यास प्रोत्साहित केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.