Press "Enter" to skip to content

नील हॉस्पिटल येथे नवनिर्मित ‘सर्व धर्म प्रार्थना व मेडिटेशन स्थान’ याचे उद्घाटन व लोकार्पण मा. खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

पनवेल : प्रतिनिधी

आषाढी एकादशी रविवार 6 जुलाई 2025 रोजी नील हॉस्पिटल येथे नवनिर्मित ‘सर्व धर्म प्रार्थना व मेडिटेशन स्थान’ याचे उद्घाटन व लोकार्पण मा. खासदार सम्माननीय श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमा साठी श्री. प्रशांत ठाकूर मा. आमदार, डॉ. गिरीश गुणे अध्यक्ष IMA पनवेल, श्री वाय टी देशमुख, डॉ कविता चोतमोल मा. महापौर, सौ. चारुशीला घरत मा. उपमहापौर, श्री. प्रीतम म्हात्रे मा.विरोधी पक्ष नेते, राजश्री वावेकर मा नगरसेविका, बीके डॉ शुभदा नील प्रसिद्ध स्त्रीरोग कॅन्सर व गर्भ संस्कार तज्ञ, राष्ट्रपती पुस्कार प्राप्त मंगला गडमुळे, डॉ.निलेश बांठिया, नील हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. पी बी नील, आर्किटेक नम्रता व इतर मान्यवर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.

“सदा खुश रहने का फार्मूला” या विषयावर कारपोरेट ट्रेनर डॉ इ वी स्वामीनाथन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वैद्यकिय क्षेञात गेले अनेक वर्ष डॉ शुभदा नील मॅडम नविन पनवेल येथे स्थित नील हॉस्पिटल येथे अविरत सेवा देत आहेत. शरीरासोबत मनालाही बरं करण्याचा वसा गेले १५ वर्ष मेडिटेशन वर्गाद्वारे त्या करित आहेत. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला इच्छा शक्तीचं औषध मिळावं याकरिता नील हॉस्पिटल येथील एक स्थान ध्यान धारणेकरिता लोकार्पण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती योगिनी वैदू यांनी केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.