Press "Enter" to skip to content

सेवा निवृत्तीनंतर वाढवला इंग्रजी विषयाचा व्यासंग

स्पेन येथे इंग्रजीच्या जागतीक स्पर्धेत प्रा.मारोती भगत यांचा जगात डंका !

मुबंई प्रतीनीधी : सतिश वि.पाटील

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील को.ए.सो लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मारोती भगत यांनी स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेल्या इंग्लिश टीचर या इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत यश संपादन केले आहे. जागतिक स्पर्धेत प्राचार्य भगत यांनी जगात प्रथम क्रमांक पटकविण्याची प्रेरक व अभिमानास्पद कामगिरी केलीय.

ग्रामीण भागात राहून आशिया खंडात संपूर्ण भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राचार्य भगत यांच्या या कामगिरीने रायगड सह भारत देशाच्या नावलौकिकात भर पडलीय. इंग्लिशवरील अफाट प्रभुत्वाने, अस्खलित इंग्रजी संभाषण कौशल्याने प्राचार्य मारोती भगत यांचा जगात डंका गाजतोय. स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी ही संस्था दर आठवड्याला विविध जागतिक ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करते. गेल्या ११ आठवड्यापासून १५ ते २१ जून या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये प्राचार्य भगत यांनी सहभाग नोंदवून ७६७९ गुण प्राप्त करून त्यांनी प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्याचा बहुमान प्राप्त केलाय.

प्राचार्य भगत यांचा मूळ इंग्रजी विषय नाही. त्यांनी सेवा निवृत्तीनंतर इंग्रजी विषयाचा व्यासंग वाढवत इंग्रजी विषयाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. भगत यांनी आपला इंग्रजी विषयाचा व्यासंग जागतिक पातळीवर सिद्ध केलाय. अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोबाईलचा वापर विकसित होताना पालकांनी केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी, ज्ञान वृद्धीसाठीच मोबाइलचा वापर करावा, तर इतर कामासाठी मोबाईल वापर टाळावा, असा सल्ला भगत यांनी दिला.

विद्यार्थ्यांना इंग्लिश वर प्रभूत्व मिळावे यासाठी आपण इंग्लिशचे मोफत क्लासेस घेत असल्याची माहिती प्राचार्य भगत यांनी यावेळी दिली. इंग्रजीची कोणतीही मनात भीती न बाळगता इंग्लिशचा व्यासंग वाढवून इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहून इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न केला तर लवकर इंग्लिश शिकता येते असा सल्ला प्राचार्य भगत यांनी दिलाय.

प्राचार्य भगत यांनी मिळवलेल्या अद्वितीय यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.