
दोन्ही बेटांमधील अंतर फक्त साडेतीन किलोमीटरचं… पण वेळेचं अंतर तब्बल 21 तासांचं !
संतोष कारखानीस : ठाणे
काल आणि उद्या यांचं बेट – डायोमीड आयलंड्सची गूढ कहाणी
बेरिंग सामुद्रधुनीत दोन छोटी बेटं आहेत – लिटल डायोमीड आणि बिग डायोमीड. या दोन्ही बेटांमधील अंतर फक्त साडेतीन किलोमीटरचं… पण वेळेचं अंतर तब्बल 21 तासांचं आहे!
लिटल डायोमीड बेट अमेरिकेचं आहे, आणि तिथं आजचा दिवस चालू असतो. दुसरीकडे बिग डायोमीड बेट रशियाचं आहे, जिथं आधीच उद्या सुरू झालेला असतो! म्हणूनच लिटल डायोमीडला “Yesterday Island” आणि बिग डायोमीडला “Tomorrow Island” म्हणतात.
या दोन्ही बेटांमध्ये इंटरनॅशनल डेट लाइन जाते – जी पृथ्वीवरील ‘आज आणि उद्या’ यांचं काल्पनिक सीमारेषा ठरवते.
लिटल डायोमीडवर थोडी लोकवस्ती आहे – सुमारे ८० एस्कीमो लोक तिथं राहतात. दुसरीकडे, बिग डायोमीडवर कुणीही राहत नाही – तिथं फक्त रशियन लष्कराचं स्टेशन आहे.
हिवाळ्यात जेव्हा समुद्र गोठतो, तेव्हा हे दोन बेटं बर्फाच्या पुलानं जोडली जातात. काही धाडसी लोक चालत एक बेटावरून दुसऱ्या बेटावर जातात – म्हणजे कालातून उद्यात किंवा उद्यातून कालात!
हे बेटं एकमेकांना स्पष्ट दिसतात. म्हणजे, अमेरिकेत उभं राहून आपण रशियाकडं बघू शकतो, आणि उलटंही.
थोडक्यात, हे बेट म्हणजे भूगोल, राजकारण आणि वेळ यांचं अद्भुत मिश्रण आहे. एवढं जवळ असूनही – दोन देश, दोन वेळा, दोन जगं!
एका बेटावर सूर्य मावळतोय… आणि दुसऱ्यावर तो आधीच उगवलेला असतो. त्यामुळेच डायोमीड बेटं सांगतात – अंतर नेहमी मैलांनी मोजू नये… काही अंतरं काळातही असतात!




Be First to Comment