
अलीबाग : प्रतिनिधी
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व देवळोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच देवेंद्र अनंत पाटील यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली.
यावेळी त्यांना नियुक्ती पत्रक देताना व त्यांचे अभिनंदन करतांना शेकापचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस भाई जयंत पाटील, मा.आमदार बाळाराम पाटील साहेब, शेकापचे जिल्हा चिटणीस व आरडीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेशशेठ खैरे, शेकापचे राज्य चिटणीस मंडळाचे खजिनदार अतुलशेठ म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते चित्रलेखा नृपाल पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ मानसी ताई म्हात्रे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिवानी ताई संतोष जंगम, शेकापचे जिल्हा सहचिटणीस अँड गौतम पाटील, जिल्हा सहचिटणीस तेजस्वी घरत, शेकापचे कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर तसेच आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment