जी टी आय टर्मिनल्स मुंबई न्हावा शेवा तर्फे धूतूम सरपंच यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील गरजू कुटूंबांना मदत
सिटी बेल लाइव्ह / उरण (अजित पाटील )
जी टी आय टर्मिनल्स मुंबई न्हावा शेवा तर्फे धूतूम सरपंच यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील गरीब गरजूं १५३ कुटुंबांना अन्न धान्य किट प्रत्येकी (15किलो चे) वितरण करण्यात आले.
या वेळी सरपंच सौ रेश्मा शरद ठाकुर यांच्या सोबत उपसरपंच सौ आशा महेंद्र ठाकुर,माजी उप सरपंच सौ वैशाली किशोर पाटील,सदस्या सौ सविता रुपेश ठाकुर, सदस्य श्री शरद ठाकुर, माजी उपसरपंच श्री.सदानंद ठाकुर, लिपीक सौ सुजाता ठाकुर,ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ श्री दतू भिवा ठाकुर,श्री संदेश शेठ ठाकुर,श्री अमृत रामचंद्र ठाकुर, श्री आत्माराम सावळाराम ठाकुर, पोलिस पाटील सौ सुनीता ठाकुर, श्री दत्ता धावजी ठाकुर, मेघनाथ ठाकुर, सुनील ठाकुर, जयेश घरत, महेंद्र ठाकुर, तुकाराम ठाकुर, प्रकाश ठाकुर,प्रकाश पुंडलिक ठाकुर व इतर नागरिक यांच्या सहकार्याने धान्य वितरण पार पाडला.
यावेळी सरपंच यांनी जी टी आय टर्मिनल्स मुंबई यांचे आभार व्यक्त केले.








Be First to Comment