प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / खांदा कॉलनी #
कोरोना या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण आणण्यासाठी गर्दी होऊ न देणे याकरीता आवश्यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीस प्राधान्य दिले जात आहे. या अनुषंगाने खांदा कॉलनी परिसरातील हजारोंच्या संख्येने स्थापन होणाऱ्या घरगुती व सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त आणि कार्यकारी अभियंता, सिडको लि. यांना दिले.
गणेश भक्तांच्या भावनेचा आदर करून सामाजिक बांधिलकी जपत कृत्रिम तलावांची निर्मिती करून गणेश भक्तांसाठी गर्दी विरहित विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी या निवेदनातून केली आहे.






Be First to Comment