Press "Enter" to skip to content

शिवसैनिक राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने कार्यक्रम संपन्न

शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र १९ तर्फे दगडी शाळा येथे मोफत छत्री वाटप व वृक्षारोपण

पनवेल / प्रतिनिधी : –

शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र १९ च्या वतीने पनवेल महानगरपालिका शाळा क्र २ दगडी शाळा येथे शिवसेना वर्धापनदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले तसेच या निमित्ताने शाळेत वृक्षारोपण देखील करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी सांगितले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उक्ती नुसार ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण तसेच पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनुसार आम्ही राजकीय क्षेत्रात नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असून त्याचाच हा एक भाग आहे. त्यानुसार शिवसैनिक राहुल गोगटे यांच्या प्रयत्नातून शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शाळेत वृक्षारोपण करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा सल्लागार – रमेश गुडेकर, जिल्हाप्रमुख – रामदास शेवाळे , महानगरप्रमुख – प्रथमेश सोमण, उपजिल्हाप्रमुख – परेश पाटील, उपमहानगर प्रमुख – महेश सावंत, शहरप्रमुख – प्रसाद सोनावणे ,उपशहरप्रमुख – शैलेश जगनाडे, सुजन मुसलोंडकर,विक्रम पाटणकर, मंदार काणे,आदी शिवसैनिक उपस्थित होते, तसेच पनवेल दगडी शाळेचे मुख्याध्यापक सुजित म्हात्रे, शिक्षक कमल तायडे ,वैभव पाटील,वैशाली सावळे, अर्चना माने, स्वाती पाटील यांनी शिवसेनेच्या या उपक्रमाबाबत आभार मानले.
सदर छत्री वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम शिवसैनिक राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.