
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाच्या समर्थनार्थ “दिबा समर्थन भव्य कार, बाईक आणि रिक्षा रॅली”
मुबंई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाच्या समर्थनार्थ, आणि दि बा पाटील साहेबांना मानवंदना देण्यासाठी भव्य “दिबा समर्थन कार, बाईक आणि रिक्षा रॅली” काढण्यात आली.
दिनांक: २४ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष मा.श्री.दशरथ दादा पाटील,भिवंडीचे खासदार मा.श्री.सुरेश बाळ्या मामा म्हात्रे,मा.आमदार श्री.बाळाराम पाटील,डॉ,यशवंत सोरे,डॉ.प्रा.विनोद पाटील,श्री.निलेश पाटील,दिपक म्हात्रे,दिपक पाटील,संतोष केणे,विशुभाऊ म्हात्रे,विजय पाटील,संजय मढवी,डॉ.तपन पाटील,संतोष घरत,दिपक पाटील,विनोद म्हात्रे,मनोहर पाटील,सुशांत पाटील,सर्वेश तरे आणि कृती समितीचे सर्व पदाधिकारी यांनी झेंडा दाखवून सुरु करण्यात आली.मोठ्या उत्साहाने,मोठ्या संख्येने सहभागी होऊन हजारोंच्या संख्येने कार,बाईक,रिक्षा वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर जवळून पाम बीच मार्गे विमानतळ रेती बंदर गेट ते कालभैरव मंदिर चिंचपाडा करंजाडे पनवेल येथे समारोप करण्यात आले.

Be First to Comment