सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ३६ जण सापडले आहेत. तर १६ जणांना घरी सोडण्यात आले असून ४ जण मयत झाले आहेत.
आज एकूण पॉझिटीव्ह १०७५, उपचार करून बरे झालेले ८६३, उपचार घेणारे १६४, मयत ४८ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज चिरनेर १, जेएनपीटी ६, दिघोडे ३, नवापाडा विंधणे १, श्री समर्थ अपार्टमेंट उरण २, जेएनपीटी पोर्ट १, करळ १, धुतुम ३, डाऊर नगर २, पिरवाडी १, करंजा १, जासई ३, नागाव १, बोकडविरा १, कोप्रोली १, नवघर १, हरिपांडव पंथ १, कंठवली १, नवीन शेवा १, भेंडखळ १, बोकडविरा १, रांजणपाडा १, खोपटे १ असे एकूण ३६ पॉझिटीव्ह आढळले आहेत. चिरनेर १, नवापाडा विंधणे १, खोपटे १, रांजणपाडा १, जेएनपीटी टाऊनशीप ३, डाऊर नगर २, पिरवाडी १, धुतुम २, नवघर १, हरिपांडव पंथ १, नवीन शेवा १, दिघोडे १ असे एकूण १६ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर फुंडे १, कोंढरीपाडा करंजा १, बोकडविरा १, भेंडखळ १ असे एकूण ४ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू आज झाला आहे.
उरणमध्ये आज पॉझिटीव्ह सापडण्याचा आकडा हा काही दिवसांपासून अत्यंत मोठा असा आहे. तसेच मृत्यूचाही आकडा वाढत चालला आहे. ही उरणकरांसाठी चिंताजनक गोष्ट मानली जात आहे. त्यात दोन दिवसांवर १५ ऑगस्ट स्वतंत्र दिन साजरा होणार आहे. त्यादिवशी अत्यंत खबरदारी घेऊन साजरा करण्याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक बनले आहे.
एकूण ४ जणांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये पॉझिटीव्हचा आकडा वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. आजपर्यंत कोरोनाने ४४ जणांना मृत्यूने गाठले आहे. यामुळे उरणकरांनी आता योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.






Be First to Comment